top of page

शाकुंतलम: समंथाचा पहिला लूक आऊट

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही काही ना काही कारणावरून चर्चेत असते. ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ या आयटम साँगमुळे ती चर्चेत होती. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे, तिच्या आगामी चित्रपट "शाकुंतलम"मुळे... शाकुंतलम या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले असून समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'शाकुंतलम' या तिच्या आगामी चित्रपटातीलं फर्स्ट लूक शेअर केला आहे. समांथाच्या या पोस्टला काही तासातच ७ लाखांहून अधिक जणांनी लाईक केले आहे.

'शाकुंतलम' हा समंथाचा पहिला पौराणिक चित्रपट आहे. 'शाकुंतलम' ही शकुंतला आणि दुष्यंत यांच्या महाकाव्य प्रेमकथेवर आधारित आहे, देव मोहन 'शाकुंतलम' मध्ये राजा दुष्यंताच्या भूमिकेत आहे, तर अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अर्हा ही राजकुमार भरतच्या भूमिकेत दिसणार आहे.

'शाकुंतलम'साठी सेखर व्ही जोसेफ हे सिनेमॅटोग्राफर आहेत, तर प्रवीण पुडी हे संपादन सांभाळत आहेत. मणि शर्मा साउंडट्रॅक आणि बॅकग्राउंड स्कोअर तयार करणार आहेत. चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नीलिमा गुणा निर्मित, पौराणिक चित्रपटात VFX टेक्नोलॉजी आहे. निर्माते पोस्ट-प्रॉडक्शन औपचारिकता लवकरच पूर्ण करण्यास उत्सुक आहेत.


Comments


bottom of page