top of page

समीर वानखेडे प्रकरण : ... आता प्रभाकर साईल एनसीबीला सापडेनात

प्रभाकर सैल यांनी समीर वानखेडे यांच्यावर किरण गोसावी यांच्यामार्फत खंडणी मागितल्याचा आरोप करणारे शपथपत्र सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. या आरोपानंतर नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) ने या प्रकरणाची चौकशीदेखील सुरू केली आहे. जबाब नोंदवण्यासाठी प्रभाकर सैल सापडत नसल्याने एनसीबीने अखेर मुंबई पोलिस आयुक्तांन पत्र लिहिले आहे.

ree

सैल यांची चौकशी करून त्यांचा जबाब घेण्यासाठी एनसीबी मुंबई कार्यालयाने त्यांना दोन दिवसांपूर्वीच चौकशीसाठी बोलवले. पण, ते चौकशीसाठी एनसीबी मुंबई कार्यालयात किंवा या विशेष पथकासमोर आलेले नाहीत. एनसीबीने त्यांचा राहत्या पत्त्यावरही शोध घेतला. पण तेथेही सैल सापडले नाहीत. त्यामुळे अखेर एनसीबीने मुंबई पोलिसांना सैल यांना चौकशीसाठी हजर करावे, अशी विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले.



 
 
 

Comments


bottom of page