top of page

गुणरत्न सदावर्तेंना अटक

मुंबईः गावदेवी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. अटक करण्यापूर्वी त्यांची तब्बल दीड तास चौकशी करण्यात आली. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास परळ येथील त्यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर सदावर्ते यांना गावदेवी पोलिस ठाण्यात नेण्यात आले

ree

पोलिसांनी सदावर्ते यांच्यावर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदावर्ते यांच्यावर बेकायदा जमाव जमविणे, सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना दुखापत करण्याच्या उद्देश्याने कृत्य आणि हल्ल्याचा कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांना सदावर्ते यांची काही चिथावणीखोर भाषणंही मिळाली आहे. यात सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना चिथावल्याचा दावा करण्यात येत आहे.


शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी रात्री आठ वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे पथक धडकले. यात महिला पोलिसही होत्या. यानंतर पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतले.


दरम्यान, पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलेलं नाही. कुठलीही नोटीस न देता अटक केली आहे. पोलिसांकडूनही आमच्या जीवाला धोका आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि शरद पवार यांचा पोलिसांवर दबाव आहे, असा आरोप सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केला आहे.

 
 
 

Comments


bottom of page