top of page

गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या एका जुन्या प्रकरणात अ‍ॅड सदावर्ते यांना गुरुवारी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज शुक्रवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एका टीव्ही चॅनलवर सदावर्ते यांनी दोन्ही राजेंविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी राजेंद्र निकम ( तारळे , ता पाटण ) यांनी सदावर्ते यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात २०२० मध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.


 
 
 

Comments


bottom of page