top of page

सचिन वाझे यांना अखेर अटक

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांसह स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ही कारवाई केली आहे. शनिवारी सकाळपासून तब्बल १३ तास चाललेल्या चौकशीनंतर वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी नवीन वळण मिळालं आहे.

ree

सत्र न्यायालयाने फेटाळलेली अंतरिम अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावल्यानंतर वाझे यांच्यावर एनआयएने कारवाई केली आहे. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कार मनसुख यांच्या ताब्यात होती. त्यामुळे मनसुख यांची हत्या आणि त्यांच्या कारची चोरी ही प्रकरणे एकाच गुन्ह्याचे पैलू असल्याने एनआयएने दोन दिवसांपूर्वी हिरेन कुटुंबाकडून माहिती घेतली. शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सकाळपासून वाझे यांच्याकडे चौकशी केली. तब्बल १३ तास चाललेल्या चौकशीनंतर अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. त्यांच्या कोठडीची मागणी एनआयकडून केली जाणार आहे.


मनसुख हिरेन प्रकरणात सहायक पोलीस आयुक्त सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. सचिन वाझेला अटक झाली. पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही जाब द्यावाच लागेल, असेही सोमय्या यांनी ट्विट म्हटले आहे.

 
 
 

Comments


bottom of page