top of page

पवार-गडकरी एकाच मंचावर; मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांची गैरहजेरी

अहमदनगर : येथील महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निम्मिताने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांची हजेरी अपेक्षित होती. पण ऐनवेळी त्यांनी दांडी मारुन त्यांनी पवारांसोबत एकाच मंचावर येणं टाळलं.

ree

सकाळी पावणे अकराच्या सुमारास शरद पवार आणि नितीन गडकरी नगरमध्ये दाखल झाले. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सपुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. पण यादरम्यान राधाकृष्ण विखेंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. त्यांच्या गैरहजेरीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.


 
 
 

Comments


bottom of page