top of page

आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली...

एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्यसेवेवर प्रचंड ताण आला आहे. तर दुसरीकडे डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. असाच एक प्रकार विरार पूर्वमध्ये समोर आला आहे. आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली. बालाजी हॉस्पिटलमधील हा प्रकार असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ree

शनिवारी एक महिला रुग्ण आपली कोविड आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी विरार पूर्वेतील बालाजी हॉस्पिटलमध्ये गेली होती. दरम्यान, टेस्ट करताना या रुग्णाच्या नाकात आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारी स्टिक तुटल्याचे समजले. यावेळी डॉक्टर पळून जात असल्याचे समजून इमारतीखाली उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांला पकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.

महत्त्वाचं म्हणजे हे शुटिंग नातेवाईकांनीच केलं असल्याचं व्हिडीओतून येणाऱ्या आवाजावरून कळत आहे. डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
 
 

Comments


bottom of page