top of page

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन, तीन परिचारिकांची सेवा समाप्त!

अहमदनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली आणि आता या दुर्घटनेप्रकरणी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन परिचारिकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली आहे.

ree

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे खालील प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे

1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा - निलंबित

2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित

3. डॉ. विशाखा शिंदे - वैद्यकीय अधिकारी- निलंबित

4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित

5. आस्मा शेख -स्टाफ नर्स - सेवा समाप्त

6. चन्ना आनंत - स्टाफ नर्स- सेवा समाप्त

अशी माहिती ट्विटद्वारे आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेली आहे.



 
 
 

Comments


bottom of page