top of page

पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा झटका

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामन्यांमध्ये रोहित शर्मा पहिल्या दिवशी फलंदाजीला आला, पण दुसऱ्या डावात तो दिसला नाही. याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सराव सामन्यात फलंदाजीसाठी का उतरला नाही हे स्पष्ट केले आहे.

ree

रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली असून सध्या तो हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. याआधी रविचंद्रन अश्विन व विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता ते दोघेही बरे आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातूनही ही कसोटी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


Comments


bottom of page