top of page

पवार साहेब खोटं बोलले असा आरोप विरोधकांनी केला.... आम्ही म्हणतो हो बोलले!...

रोहित पवारांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा!

ree

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर ट्विट करत अनेक आरोप केले होते. त्यामध्ये १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसंदर्भात दिलेल्या माहितीबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी ट्विट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार यांनी केलेल्या ट्वीटमध्ये शरद पवारांच्या मुलाखतीची एक क्लिप शेअर केली. पवारांची ही क्लिप शेअर करताना रोहित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “पवार साहेब खोटं बोलले असा आरोप विरोधकांनी केला.... आम्ही म्हणतो हो बोलले! पण ते का खोटं बोलले? हे अपप्रचार करणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवायचंय! खास त्यांच्यासाठी हा व्हिडीओ”, असं रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page