top of page

... भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर आणि सरकारवर सतत होणाऱ्या टीकेवरुन आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

ree

रोहित पवार यांनी सर्वप्रथम ट्विट करत मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी "'प्रश्नम' या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे महाविकास आघाडी सरकारचं यश आहे." असं म्हटलं आहे.

त्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये " उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!" असा सल्ला रोहित पवार यांनी भाजपला दिला.


 
 
 

Comments


bottom of page