top of page

VIDEO : कोविड सेंटरमध्ये रोहित पवारांचा ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स!

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. लोकप्रतिनिधी आपापल्या परीने शक्य ती मदत कोरोनाबाधितांना करत आहेत. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे कोविड सेंटर उभारण्यात आलं असून काल (सोमवारी) रोहित पवार यांनी कर्जत येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी सैराटमधील "झिंगाट" या गाण्यावर डान्स करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रोहित पवारांनी हा व्हिडीओ स्वतः ट्विटरवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

ree

रोहित पवार यांनी गायकरवाडी (कर्जत) येथील या कोविड सेंटरला सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या 'झिंगाट' गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि नकळत रोहित पवार हेही त्यांच्यात सहभागी झाले.


पहा व्हिडीओ –



 
 
 

Comments


bottom of page