top of page

पहिल्या सामन्यापेक्षा ट्रॉफी जिंकणे महत्वाचे

IPL 2021 : सलग 9 वेळा मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात पराभव


आयपीएलच्या 14व्या मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सला 2013 पासून सलग 9 वेळा आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने बंगळुरूसमोर 20 षटकात 9 गडी गमावत 159 धावा केल्या.

ree

सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ”पहिल्या सामन्यापेक्षा ट्रॉफी जिंकणे महत्वाचे आहे. आम्ही शेवटपर्यंत मेहनत घेतली. आम्हाला 20 धावा कमी पडल्या. आम्ही या सामन्यात नंतर खूपच समाधानकारक कामगिरी केली. बुमराह ट्रेंटची षटके लवकर संपवणे चुकीचे ठरले. या खेळपट्टीवर नीट चेंडू येत नव्हता. यापुढे खेळताना खेळपट्टीचा अंदाज घेऊन खेळावे लागेल.”


 
 
 

Comments


bottom of page