top of page

तो सुरक्षाकवच भेदत मैदानात घुसला आणि रोहित शर्मा...

रांची : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळविला या सामन्यात रोहित शर्माने फक्त अर्धशतक झळकावत अनेक विक्रम त्याच्या नावावर केले. पण या सामन्यातील रोहित शर्माचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला असून त्याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भारतीय संघ जेव्हा क्षेत्ररक्षण करत असताना रोहितचा तेव्हा एक चाहता सुरक्षाकवच भेदत मैदानात घुसला आणि तो रोहितकडे धावत गेला. रोहितपुढे गेल्यावर हा चाहता त्याच्यापुढे नतमस्तक झाला. हा फोटो व्हायरल झाला असून फोटोची जोरदार चर्चाही सुरु आहे.

ree

कर्णधार म्हणून रोहित शर्माने दोन सामन्यांमध्येच मालिका जिंकली आहे. त्याचबरोबर या सामन्यात त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदले गेले. त्यामुळेच चाहत्यांच्या गळ्यातील रोहित ताइत बनला आहे. अशीच एक गोष्ट न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही पाहायला मिळाली. भारतीय संघ जेव्हा क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा एक चाहता सर्व सुरक्षाकवच भेदत मैदानात घुसला आणि तो रोहितकडे धावत गेला. रोहितपुढे गेल्यावर हा चाहता त्याच्यापुढे नतमस्तक झाला. हा फोटो सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या फोटोची जोरदार चर्चाही सुरु आहे.

दरम्यान, दुसऱ्या ट्वेन्टी०-२० सामन्यात रोहित शर्माने ४५० षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज आहे. याआधी पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांनी ४५० षटकारांचा टप्पा पार केला आहे.



 
 
 

Comments


bottom of page