top of page

कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला

अफगाणिस्तानातून अमेरिकेनं लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानकडून अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागांवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अफगाणिस्तानसह कंदहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमकी सुरू असतानाच कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री तीन रॉकेट डागण्यात आले. यात एक विमानतळावर तर दोन हवाई पट्ट्यांवर डागण्यात आले. त्यामुळे सर्व विमानं रद्द करण्यात आली. कंदहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं एएफपी या वृत्तसंस्थेनं रॉकेट हल्ला झाल्याचं वृत्त दिलं आहे. या हल्ल्याबद्दल अधिकची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


 
 
 

Comments


bottom of page