top of page

मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना भीषण अपघात;१८ जणांचा मृत्यू

मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना झालेल्या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात ही घटना घडली.

ree

उत्तर परगणा येथील बागडा येथून २० पेक्षा अधिक लोक एका मॅटाडोरमध्ये मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी नवद्वीप स्मशानभूमीकडे जात होते. वाहन हंसखळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुलबारी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला चालत्या मॅटाडोरची धडक बसली. यामध्ये १८ लोकांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


 
 
 

Comments


bottom of page