top of page

'फँड्री'तील राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत

नागराज मंजुळे यांनी ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून ग्रामीण महाराष्ट्राचं धगधगतं समाजवास्तव प्रेक्षकांसमोर मांडलं. या चित्रपटातील जब्या आणि शालूच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘फँड्री’चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राजेश्वरी खरात हिची ‘रेड लाईट’ नावाची एक शॉर्ट फिल्म नुकतीच रिलीज झाली. राजेश्वरीने याबाबत एक भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

काय म्हंटले आहे राजेश्वरीने पोस्टमध्ये ?

तो आला, बसला, आणि गेला पण सर्वांच्या नजरा मात्र तिच्यावरच अडल्या.

स्त्री ने असे काम करने योग्य नवे परंतु पुरुषाने केलेले अतिउत्तम. काही काम धंदा का करीत नाहीस, फक्त पैश्यांसाठी लाचारीचे सोंग घेतीस. पण तुम्ही तुमच्या घरात धुणे भांड्याचे तरी काम देताल का एवढेच सांगा, आणि जरी काम दिले तरी त्या मागचा हेतू हा सर्वांनाच माहिती असतो.

गल्लीकडे येतांना तोंड लपवून येतात पण येतात मात्र नक्की. थोडावेळसाठी च खेळण घेतल्यासारखं आमची आबरू काढून घेता आणि मोबाईल च्या रिचार्ज पेक्षा कमी किम्मत देता. सर्वांना हे खेळण आयुष्यात एकदातरी पाहिजे असतच पण कोणी याला कायमच आपलं करून घेण्याची हिम्मत ठेवतात का? नाही, कारण वेश्या व्यवसाय करणारी स्त्री चारित्र्यहीन असते आणि बाकीचे सर्व अगदीच पवित्र असतात.

समाजात आणखी बर्‍याच काही गोष्टी वेश्ये बद्दल बोलल्या जातात पण कोणी मात्र कधी त्यांच्या हितात बोलत नाही, सर्वजण फक्तं ऐकुन मजा घेतात.

कृपया थोडीफार दया त्यांच्यावरही करा ज्या आपल्या घरातील माता भगिनींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाहीत.



Comments


bottom of page