top of page

सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरु

‘सैराट’ या चित्रपटातील ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नवा चित्रपट "आठवा रंग प्रेमाचा” १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू राजगुरुच्या या नव्या चित्रपटाचे पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले आहे. रिंकूने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये रिंकू राजगुरु आणि विशाल आनंद हे दोघेही दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना रिंकूने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. ‘सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरु, ‘आठवा रंग प्रेमाचा’ १७ जून पासून चित्रपटगृहात…’, असे रिंकूने यावेळी म्हटले आहे.

“आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाची निर्मिती समीर कर्णिक यांनी केली आहे. तर दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांनी केलं आहे. विशाल आनंद हा या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. समीर कर्णिक यांनी “क्युं हो गया ना..” या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर “यमला पगला दिवाना”, “चार दिन की चांदनी”, “हिरोज”, “नन्हे जैसलमेर” अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.


Comments


bottom of page