top of page

प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. यावेळी प्रियांका गांधी, केसी वेणुगोपाल राव आणि हरीश रावत अशी पक्षातील काही वरीष्ठ मंडळी देखील हजर होती.

राजकीय रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचे संकेत देणारे प्रशांत किशोर यांनी अचानक पुन्हा राजकीय नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केल्याने नेमकं प्रशांत किशोर यांचं चाललंय काय? याविषयी तर्त वितर्क लढवले जात आहे. राहुल गांधी यांच्या भेटी दरम्यान नेमकी कोण-कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकले नाही.


コメント


bottom of page