top of page

"मोदींच्या विकासाची गाडी रिवर्स गियरमध्ये... ब्रेक देखील फेल "

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यानंतर दिवाळीपूर्वी केंद्रानं एक्साईज ड्युटी कमी केल्याची घोषणा केली. त्यामुळे ४ ते ७ रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये घट झाल्याचं दिसून आलं. मात्र, एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमती काहीशा कमी झाल्या असल्यातरी दुसरीकडे घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरांच्या बाबतीत मात्र सामान्यांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे तब्बल ४२ टक्के लोकांनी गॅसचा वापर करणं बंद केला. त्या लोकांनी पुन्हा एकदा लाकडी इंधनाचा वापर करून चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला आहे. जनसत्ताच्या याच बातमीचा स्क्रीन शॉट राहुल गांधी यांनी शेअर करत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

“विकासाच्या आश्वासनांपासून कित्येक मैल दूर असलेल्या लाखो परिवारांवर पुन्हा चूल फुंकण्याची वेळ ओढवली आहे. मोदीजींच्या विकासाची गाडी रिवर्स गियरमध्ये आहे आणि त्या गाडीचे ब्रेक देखील फेल आहेत”, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.





 
 
 

Comments


bottom of page