top of page

गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार

रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर; रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ

ree

भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत समितीच्या ६ पैकी ४ सदस्यांनी रेपो रेट वाढवण्याच्या निर्णयाच्या बाजुने मतदान केलं. या बैठकीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. . त्यामुळे आता ईएमआयमध्ये होणार वाढ होणार असून याची थेट झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सहाव्यांदा वाढ केली असून बँकेचा व्याजदर ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Comments


bottom of page