top of page

'ग्लोबल टीचर' डिसले गुरुजींचा आणखी एक सन्मान; अमेरिकन सरकारची 'फुलब्राईट' स्कॉलरशिप जाहीर

सोलापूर : ग्लोबल टीचर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. यावर्षी जगभरातील ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. 'पीस इन एज्युकेशन' या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे.

ree

'लेट्स क्रॉस द बॉर्डर' या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत. याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी मिळतेय, याचा आनंद आहे, असे डिसले गुरुजी यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून डिसले कार्यरत आहेत. शालेय पाठय़पुस्तकांमध्ये क्युआर कोड समाविष्ट करण्याच्या अभिनव कल्पनेसाठी डिसले यांना गेल्यावर्षी युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्यातर्फे ग्लोबल टीचर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. अलीकडेच डिसले यांची जागतिक बँकेच्या सल्लागारपदीही निवड झाली. त्यानंतर आता त्यांना २०२१-२२ साठीच्या फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे.


 
 
 

Comments


bottom of page