top of page

कसब्यात रविंद्र धंगेकर विजयी; भाजपाला मोठा धक्का

कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत.

ree

कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात ही लढत झाली. धंगेकरांनी पहिल्या फेरीपासून आपली आघाडी कायम ठेवत ११ हजार ४० मतांनी हेमंत रासनेंचा पराभव केला आहे. शेवटच्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर यांना ७३ हजार १९४ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली. कसबापेठ विधानसभा मतदारसंघ हा गेली २८ वर्षे भाजपाच्या ताब्यात होता.रासने यांच्या पराभवामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुका लागल्या. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीऐवजी भाजपाकडून माजी आमदार हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आज मतमोजणीनंतर ही नाराजी दिसून आल्याचं सांगितलं जात आहे.


 
 
 

Comments


bottom of page