top of page

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा बैलगाडीतून फेरफटका

ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री असा गल्ली ते दिल्ली प्रवास करणारे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी बैलगाडीवरुन फेरफटका मारला.. दानवे यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबूकवरुन बैलगाडीतून फेरफटका मारतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे.

ree

यावेळी त्यांच्या सोबत पत्नी निर्मला दानवे आणि त्यांची नातही होती. या बैलगाडीची रंगसंगतीही भाजपच्या ध्वजासह मिळतीजुळती आहे. "जिवा शिवाची बैल जोड़... लाविल पैजंला आपली कुडं.... आयुष्याच्या प्रवासात भक्कम साथ देणाऱ्या सहधर्मचारिणी व त्याचबरोबर माझ्या नाती सोबत गावी असताना बैलगाडीवरून शिवारात फेरफटका मारला ", अशा आशयाची पोस्ट दानवे यांनी केली आहे.


 
 
 

Comments


bottom of page