top of page

'आरबीआय'चं पतधोरण जाहीर; व्याज दरात बदल नाही

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या चलनविषयक समितीने सलग नवव्यांदा रेपो दरात कोणताही बदल न करण्याची घोषणा केली आहे. रेपो दर ४ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.कोरोना संकटातून देशाची अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचंही शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितले.

ree

२०२१-२२ साठी वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा अंदाज ९.५ टक्क्यांवर वर कायम ठेवण्यात आला आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष २०२२ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा अंदाज आधीच्या ६.८ टक्क्यांवरून ६.६ टक्के कमी केला आहे. यासोबतच, आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीसाठी जीडीपी अंदाज ६.१ टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आला असल्याचे दास यांनी सांगितले.


 
 
 

Comments


bottom of page