top of page

चक्क माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांचेच अकाउंट ट्विटरने केले लॉक ...

केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मिडिया कंपन्यांना २६ मेपर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक होते. ट्विटरला त्यासाठी वारंवार सूचना देण्यात आली होती, पंरतु ट्विटरने नियम पाळण्यास नकार दर्शवला. त्यावरुन आधीच वाद सुरु असताना ट्विटरने आता चक्क केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांचेच अकाउंट लॉक केले. जवळपास एक तासानंतर त्यांचे अकाउंट अनलॉक करण्यात आल्याची माहिती रवि शंकर प्रसाद यांनी ट्विट करत दिली.

ree

रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत.


“मित्रांनो आज माझ्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली. ट्विटरने अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केल्याचं मला सांगण्यात आलं आणि माझे अकाउंट लॉक केले. जवळपास एक तासाने माझे अकाउंट अनलॉक करून मला त्यांनी अ‍ॅक्सेस दिला,” असं रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.एका पाठोपाठ ट्विट करत त्यांनी काहीही झालं तरी सर्व माध्यमांना नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांचे पालन करणावे लागणार आहे. त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असंही रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे.

रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटमध्ये काय म्हंटलं ?

  • ट्विटरची ही कारवाई म्हणजे माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शकतत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिशास्त्र नियम) २०२१ मधील नियम ४(८) चे उल्लंघन आहे. त्यांनी (ट्विटरने) मला माझ्या अकाऊंटला अ‍ॅक्सेस नाकारण्याआधी सूचना दिली नव्हती.

  • ट्विटरचा (नवीन नियमांसंदर्भातील) उच्च उदासीनपणा आणि अनियंत्रित कृतीविरोधात आवाज उठवणारी माझी विधाने, विशेषत: टीव्ही वाहिन्यांना दिलेल्या माझ्या मुलाखतीच्या क्लिप्स मी शेअर केल्याने आणि त्याचे परिणामकारक प्रभाव दिसून आल्याने या गोष्टी घटल्याचं स्पष्टपणे दिसत आहे

  • या कृतावरुन ट्विटर भारत सरकारने लागू केलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी का करत नाहीय हे स्पष्ट होतं आहे. कारण त्यांनी असं केलं तर त्यांच्या अजेंड्यामध्ये न बसणाऱ्या व्यक्तीचं खातं त्यांना अशापद्धतीने अचानक बंद करता येणार नाही.

  • तसेच मागील अनेक वर्षांमध्ये मी शेअर केलेल्या माझ्या मुलाखतींच्या क्लिपसंदर्भात कोणत्याही वृत्तवाहिनीने किंवा एखाद्या अँकरने कॉपीराईट कायद्याअंतर्गत तक्रार केलेली नाहीय

  • ट्विटरच्या या कारवाईवरुन ते दावा करतात त्याप्रमाणे त्यांचा भाषण स्वातंत्र्याला पाठिंबा असल्याचं दिसत नाही. उलट आपलाच अजेंडा रेटण्यामध्ये त्यांना रस आहे. ते सतत तुम्हाला आम्ही आखून दिलेल्या नियमांनुसार वागला नाहीत तर आम्ही तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकू अशी भीती दाखवत असतात


 
 
 

Comments


bottom of page