top of page

रत्नागिरी : लोटे एमआयडीसी स्फोटांनी हादरली; केमिकल कंपनीला भीषण आग

रत्नागिरी : जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोटे एमआयडीसी येथील प्रिवी ऑर्गानिक्स लिमिटेड कंपनीला भीषण आग लागली. कंपनीत सहा ते सात स्फोट झाले आणि भीषण आग लागली. ही इतकी मोठी होती की, तब्बल दहा किलोमीटर लांबून आगीच्या धुराचे लोट दिसून येत होते.

ree

या आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाहीये अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कंपनीतील सॉल्व्हंट केमिकलच्या ड्रम ठेवलेल्या विभागांमध्ये आग लागली आणि स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. शेजारीच सीएनजी गॅस कंपनी असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. आगीची माहिती मिळताच खेड, चिपळूण तालुक्यातील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठ्या शर्थीने अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आता नियंत्रणात आणली. तब्बल चार तासांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.


 
 
 

Comments


bottom of page