top of page

सावधान ! अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची चक्क रस्त्यावरच कोरोना चाचणी

राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही काही नागरिक जीवनावश्यक वस्तुच्या नावाखाली विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चक्क रस्त्यावरच रॅपिड अँन्‍टीजन चाचणी करण्‍याचा उपक्रम काही जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांची थेट रवानगी कोरोना रुग्णालयात रवानगी केली जात आहे. सध्या अमरावती, कणकवली, जळगाव आणि रत्नागिरीत ही कारवाई केली जात आहे.

ree

अमरावती शहरात उपक्रमाची गुरुवारपासून अंमलबजावणी करण्‍यात आली. शहरात बेजबाबदार नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यामुळे अमरावती महानगरपालिकेच्या वतीने चार ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून रॅपिड अँटिजिन तपासणी केली आहे. यात ज्या नागरिकांची चाचणी निगेटिव्ह आली त्यांना सोडून देण्यात येत आहेत. तर जे नागरिक पॉझिटिव्ह आढळले त्यांना क्वारांटाईन सेंटरमध्ये रवानगी करून त्यांच्या हातावर होम आयसोलेशनचा शिक्का मारला जात आहे. या कारवाईत आतापर्यंत विनाकारण फिरणाऱ्या १०० हुन अधिक लोकांना पकडून त्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे . तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन केले असल्यास दंडात्मक कारवाईसुद्धा केल्या जात आहे.


कणकवली शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. जे नागरिक विनाकारण आणि विनामास्क फिरत आहे, त्यांची थर्मलगन आणि ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केली जात आहे. तसेच जो कोणी व्यक्ती संशयित आढळल्यास त्याची जाग्यावरच रॅपिड टेस्ट केली जात आहे. पोलीस, आरोग्य विभाग आणि नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली जात आहे.


रत्नागिरीतही अनावश्यक फिरणाऱ्यांची थेट अँटीजन टेस्ट केली जात आहे. रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरात पोलिसांच्या माध्यमातून आरोग्य विभागाची धडक कारवाई केली जात आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांची थेट रवानगी कोरोना रुग्णालयात केली जात आहे.



 
 
 

Comments


bottom of page