top of page

Video : थांब रे, मध्ये बोलू नको... नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना केले गप्प !

चिपळूण: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकताच कोकणातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान राणे यांनी एका अधिकाऱ्याची कानउघडणी केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राणे अधिकाऱ्यांना झापत असताना मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवीण दरेकरांनाही राणेंनी “थांब रे मध्ये बोलू नको” असं म्हणत गप्प केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. राणेंनी आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला सर्वांसमक्ष गप्प राहण्याची सूचना केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

ree

या व्हायरल व्हिडिओत ते एका अधिकाऱ्याची कानउघडणी करताना दिसत आहेत. 'आम्ही इथं फिरायला आलो आहे का? तुमचा एकही अधिकारी इथं कसा नाही? लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्ही इथं दात काढताय? लोकं रडत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. विरोधी पक्षाचे नेते इथं आलेत, तुम्ही ऑफिसमध्ये काय करताय? तुम्हाला मॉबमध्ये सोडू का?,' असे प्रश्न विचारत राणे अधिकाऱ्यांना झापत होते. त्यावेळी दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असताना "थांब, रे मध्ये बोलू नको... " असं म्हणत राणेंनी दरेकरांना गप्प केलं. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्वत: यावेळी उपस्थित होते. ह्या व्हिडिओची सध्या राज्यभर चर्चा आहे.



 
 
 

Comments


bottom of page