top of page

जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे ट्वीट करत म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यानंतर राणे यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला. प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर रात्री "सत्यमेव जयते" असं ट्वीट करत नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, नाट्यमय घडामोडींनंतर राणेंना जमीन मंजूर करण्यात आल्यावर नितेश राणे यांनी राजनिती चित्रपटातील अभिनेता मनोज वाजपेयीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयी एका सभेला संबोधित करताना, “आसमान में थूकने वाले को शायद ये पता नही है की पलट कर थूक उन्ही के चेहरे पर गिरेगी,” असं म्हणताना दिसतो. तसेच पुढे तो, “करारा जवाब मिलेगा,” असंही म्हणतो. या व्हिडीओच्या माध्यमातून नितेश राणेंनी विरोधकांना इशारा दिला असल्याचं दिसत आहे.


 
 
 

Comments


bottom of page