top of page

मोठी बातमी! राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी काल रात्री अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. दोघांच्या जामिनावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

ree

रवी राणा यांची आर्थर रोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी होणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना चांगलंच महागात पडलं आहे..


मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं.

“आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर २७ तारखेला आमचे लेखी म्हणणे मांडण्यासाठी सांगितले आहे. यावर २९ तारखेला सुनावणी होणार आहे. तसेच यामध्ये १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.


 
 
 

Comments


bottom of page