top of page

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती, उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक

अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली करण्यात आली कारवाई


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात राज कु्ंद्रा यांची ७ ते ८ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली.

ree

अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. मढ बीचवरील एका बंगाल्यात फेब्रुवारी २०२१ मध्ये छापा टाकून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट आणि वेबसीरिज बनविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता.त्यावेळी एका अभिनेत्रीलाही पोलिसांनी अटक केली होती. याच प्रकरणात राज कुंद्रा यांना आज गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. सुमारे ७ ते ८ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी राज कुंद्रा यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. कुंद्रा यांना मंगळवार दि. २० जुलै रोजी न्यायालयासमोर हजर केलं जाणार असंल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.


 
 
 

Comments


bottom of page