top of page

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन

काँग्रेसचे खासदार ॲड. राजीव सातव यांचे आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून राजीव सातव यांचं निधन झाल्याची माहिती दिली. राजीव सातव यांना २२ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरूवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून सातव यांची प्रकृती पुन्हा एकदा गंभीर झाल्याने त्यांना शनिवारी ता. १५ पहाटे पासून व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ree

काँग्रेसचे खासदार ॲड. राजीव सातव यांचा २२ एप्रिल रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, २९ एप्रील रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. तर तातडीने गरज भासल्यास इक्मो मशीन देखील उपलब्ध करण्यात आली होती. तर मुंबईल येथील डॉ. राहुल पंडीत, डॉ. शशांक जोशी यांच्या पथकाने पुणे येथे येऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. उपचाराअंती राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. 19 दिवसांच्या उपचारानंतर राजीव सातव यांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली होती. मात्र, दोन दिवसांपासून सातव यांची प्रकृती पुन्हा एकदा गंभीर झाल्याने त्यांना शनिवारी ता. १५ पहाटे पासून व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


दरम्यान, शनिवारी (१५ मे) काँग्रेसचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयात जाऊन, सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेत विचारपूस केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘राजीव सातव यांना काल रात्र थोडा त्रास जाणवला, मात्र ते लवकरच बरे होतील,’ असं म्हटलं होतं मात्र, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.


“निःशब्द! आज मी असा सहकारी गमावला आहे, ज्याने सार्वजनिक जीवनातील पहिलं पाऊल माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये ठेवलं होतं आणि आजपर्यंत माझ्यासोबत चालत होते…. राजीव सातव यांचा साधेपणा, त्यांचं हास्य, जमिनीशी असलेली नाळ, नेतृत्वाशी आणि पक्षासोबत असलेली निष्ठा व मैत्री नेहमीच आठवत राहिल. माझ्या मित्रा अलविदा, जिथेही राहशील, झळाळत रहा,” - रणदीप सुरजेवाला 

 
 
 

Comments


bottom of page