top of page

आरोग्य विभागाच्या ३२३ आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट – राजेश टोपे

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील 567 रुग्णालयांपैकी 323 आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. 170 संस्थांचे अंदाज आराखडे तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कार्यवाही सुरु असून त्यातील 74 संस्थांचे अंदाज आराखडे तयार करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेच्या लेखी प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.

ree

सदस्य अतुल भातखळकर यांनी आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या 506 रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध नसल्याबाबतचा लेखी प्रश्न विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे की, 323 आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट झाले असून 170 संस्थांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाज आराखडे तयार करण्यासाठी मागणी केली आहे. त्यातील 74 अंदाज आराखड्यांसाठी जिल्हा नियोजन समिती व राज्यस्तरावरुन निधी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे. अग्नीशमन विभागास सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे कळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

 
 
 

Comments


bottom of page