top of page

VIDEO : काही कळायच्या आत मालगाडीखाली पडून कॉन्स्टेबलचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

कधी काय होईल हे, हे कोणीही सांगू शकत नाही. याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना आगराच्या राजामंडी रेल्वे स्टेशनवर घडली. प्लॅटफॉर्मवरून अचानक मालगाडीखाली पडून एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ०९.३० च्या सुमारास घडली. संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे .हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.


पोलीस कॉन्स्टेबल रिंगल कुमार सिंह हे रेल्वे प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असताना त्याच्यामागून एक मालगाडी स्टेशनवरुन जात असताना व्हिडिओत दिसत आहे. रिंगल कुमार सिंह यांना अचानक चक्कर येते व ते त्यांच्या जागी फिरू लागतात. चार फेऱ्या घेतल्यानंतर त्यांचा तोल जाऊन ते प्लॅटफॉर्मवरून मालगाडीच्या चाकांमध्ये खाली पडतात. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

कॉन्स्टेबल रिंगल कुमार सिंह हे बिजनौरचे रहिवासी होते. त्यांना दोन लहान मुले असून लहान मुलगा फक्त एक महिन्याचा आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये जीआरपीमध्ये कॉन्स्टेबलची नियुक्ती झाली होती.


 
 
 

Comments


bottom of page