top of page

राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही; भाजप खासदाराने दिला इशारा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे पुढील महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण, त्यापूर्वीच भाजप खासदाराने राज ठाकरे यांना इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा वेळोवेळी अपमान केला आहे. त्यांनी आधी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी, अन्यथा ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, असे भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी म्हंटले आहे.

ree

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येत जाणार आहे. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी ट्वीट करून 'राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांचा वेळोवेळी अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी हात जोडून माफी मागावी मगच अयोध्येला यावे' असं म्हटलं आहे.


तसंच, योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट नाकारावी. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना भेट देऊ नये, असा सल्लाही सिंह यांनी मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांना दिला आहे.


Comments


bottom of page