top of page

मनसेने शेअर केलेल्या ९३ सेकंदाच्या व्हिडिओत नेमके काय म्हंटले ? Video पहा ...

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून बाळासाहेबांना अभिवादनही केलं जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ मनसेने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओत राज ठाकरे यांनी शिवसेना सोडतानाच्या शिवसेनाप्रमुखांसोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

ree

मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात मनसेच्या मेळाव्यामध्ये मनसैनिकांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी शिवसेना सोडतानाचा किस्सा ऐकवला. शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरे यांची शेवटची भेट घेतली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.


जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात… राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा ‘राज’कीय संवाद!, असं ट्विट करत मनसेने 93 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच हा व्हिडीओ ट्विट करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.


 
 
 

Comments


bottom of page