top of page

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांचा पुणे दौरा

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. १९ ते २१ जुलै या दरम्यान ते शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बरोबर पक्ष बांधणी आणि आगामी महापालिका निवडणूक या विषयी संवाद साधणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांचा पुणे दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय.

ree

राज संवाद उपक्रमाअंतर्गत, आज १९ जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघाची सेनापती बापट रोडवरील, इंद्रप्रस्थ कार्यालय येथे बैठक होत आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ वेळेत कोथरूड आणि खडकवासला माणिक बाग पेट्रोल पंपा समोरील, परिणय मंगल कार्यालयात होणार आहे.


दुसर्‍या दिवशी मंगळवारी २० जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत हडपसर आणि कॅन्टोन्मेंट विभागाची कोंढवा खुर्द येथील लोणकर लान्स येथे बैठक होणार असून, १ ते ४ दरम्यान कसबा आणि पर्वती विभागाची बिबवेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक होणार आहे.


 
 
 

Comments


bottom of page