top of page

राज ठाकरे यांनी दीड तासात खरेदी केली ५० हजार रुपयांची पुस्तकं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पुणे दौऱ्यावर आल्यानंतर राज ठाकरे यांनी राजकारणातून वेळ काढून मंगळवारी सायंकाळी अक्षरधारा बुक गॅलरीला भेट दिली. त्यांनी दीड तास पुस्तकांच्या सानिध्यात घालवला, निवडक पुस्तके चाळली. राज ठाकरे यांनी तब्बल २०० पुस्तकं खरेदी केली. त्याची किंमत जवळपास ५० हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये गोविंद सखाराम देसाई लिखित मराठी रियासतचे आठ खंड, मृत्युंजयची नवीन आवृत्ती या पुस्तकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्याच्या उद्देशाने मंगळवारी रात्री पुण्यात दाखल झाले होते. राज ठाकरे यांनी वेळ काढून सायंकाळी बाजीराव रोडवरील अक्षरधारा बुक गॅलरीला भेट दिली. यावेळी राज ठाकरे हे प्रसारमाध्यमांवर चांगलेच संतापले होते. प्रसारमाध्यम प्रतिनिधींना पाहून त्यांनी ‘काही जगू द्याल की नाही?’ असं म्हणत त्यांना कॅमेरे बंद करायला लावले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी दीड तास पुस्तकांच्या सानिध्यात घालवला. अक्षरधारा बुक गॅलरीत निवांतपणे बसून पुस्तकं चाळली.


 
 
 

Comments


bottom of page