top of page

पुढील ४ दिवसांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी

महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. जूनचे तीन आठवडे कोरडे गेल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस राज्यात दाखल झाला. पुढील चार ते पास दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख होसाळीकर यांनी काल (५ जुलै) ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली.

'पुढील ३,४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी.खूप दिवसांनी रेड अलर्ट दिसतोय. कृपया IMD कडील माहितीनुसार योजना करा. काळजी घ्या' असं ट्वीट होसाळीकर यांनी केलं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया या भागातही येत्या काळात पाऊस जोर धरणार आहे.


 
 
 

Comments


bottom of page