top of page

धोनी नाही तर मी पण नाही...

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सुरैश रैना या दोघांनी एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ते दोघे चांगले मित्र असून चेन्नई सुपर किंग्जचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. पुढील आयपीएलमध्ये धोनी खेळणार नसेल तर तोसुद्धा या आयपीएलमध्ये खेळणार नाही, असे रैनाने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. या वरून दोंघांची मैत्री किती घट्ट आहे, हे समोर आले आहे.

ree

रैनाने नुकतीच न्यूज २४ स्पोर्ट्सला मुलाखत दिली. त्यात तो म्हणाला,जर धोनी आगामी आयपीएल हंगामाचा भाग नसेल, तर मलाही आयपीएलचा पुढचा हंगाम खेळण्याची इच्छा नाही. आम्ही २००८ पासून एकत्र खेळत आहोत. यंदाची आयपीएल स्पर्धा जर आम्ही जिंकू शकलो, तर मी पुढच्या हंगामात खेळण्यासाठी त्याला विनंती करेन. ”पुढच्या सत्रात दोन नवीन संघ येत आहेत, पण मला सीएसकेकडून खेळायचे आहे. मला आशा आहे, की या स्पर्धेत चांगली कामगिरी होईल, मग काय होते ते पाहू, असेही त्याने सांगितले.

 
 
 

Comments


bottom of page