top of page

राज्यातील "या" ९ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

पुढील चोवीस तासांत मोसमी पाऊस अंदमानात दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ९ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यताही हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोसमी पाऊस चोवीस तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील नऊ जिल्ह्यांना १६ ते १९ मे पर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (येलो ॲलर्ट ) हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे

 
 
 

Comments


bottom of page