top of page

VIDEO : पोलिसाने वाचवला प्रवाशाचा जीव ; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

रेल्वे रूळ ओलांडण्याऐवजी पादचारी पुलाचा वापर करा, धावत्या रेल्वेतून उतरु नका, धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करु नका अशा सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार देण्यात येतात. मात्र, या सूचनांकडे अनेक नागरिक दुर्लक्ष करताना दिसतात. काही जण लोकल पकडण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक दुर्घटना घडतात. असाच प्रकार काल (गुरुवार) ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पाहायला मिळाला. तेथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचा जीव वाचला.

गुरुवारी (१२ मे) सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील लोकल पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न एका प्रवाशाने केला. मात्र, या नादात येणाऱ्या तो रेल्वेच्या समोर आला. तेवढ्यात तिथे ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस शिपाई तुषार सोनताटे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याला प्लॅटफॉर्मच्या दिशेने ओढले आणि त्याचा जीव वाचवला. काही सेकंदाचाही उशीर झाला असता तर क्षणार्धात प्रवाशाचा जीव गेला असता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


 
 
 

Comments


bottom of page