top of page

नेमबाजी विश्वचषक स्पर्धा : कोल्हापूरच्या राही सरनोबतनं पटकावलं सुवर्णपदक

भारताकडून क्रोएशियाच्या ओसीजेक येथे नेमबाजी विश्वचषक 2021 स्पर्धेत मराठमोळ्या नेमबाज राही सरनोबतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावलं.

ree

25 मीटर एअर पिस्तल प्रकारात राहीने सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी करत 40 पैकी तब्बल 39 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. राही पाठोपाठ फ्रान्सच्या मॅथिलडे लामोलेला हिला 31 गुणांसह रौप्यपदक मिळाले. तर रशियाच्या विन्टालिना हिला 28 गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताला नेमबाजी विश्वचषकात मिळालेले पहिलेच सुवर्णपदक आहे.


नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सौरभ चौधरी आणि मनु भाकेर या भारतीय जोडीने रौप्यपदक मिळवून दिले होते. मात्र अद्यापर्यंत भारताला सुवर्णपद पटकावता आले नव्हते. अखेर राहीने 25 मीटर एअर पिस्तल प्रकारात अप्रतिम कामगिरी करत भारताला पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

 
 
 

Comments


bottom of page