top of page

राधानगरी धरण @ 98.38 टक्के

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभर पावसाने उघडीप दिल्यानंतर आज पहाटेपासून पुन्हा ढग दाटून आले आहे. यातच जोरदार वारा सुटला असून पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत राधानगरी धरणात 8.225 टीएमसी पाणीसाठा (98.38 टक्के ) झाला आहे.

ree

धरण शंभर टक्के भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू शकते.

दरम्यान, पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक आजही (दि २५) बंदच आहे. शुक्रवारी सायंकाळपासून वाहतूक ठप्प असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. कोल्हापूरजवळच्या पुलाची शिरोली जवळ रस्त्यावर अजूनही सुमारे तीन फुटाहून जास्त पाणी आहे. आज पावसाने विश्रांती दिली तर उद्या सोमवारी (दि २६) सकाळी वाहतूक सुरू होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.


 
 
 

Comments


bottom of page