top of page

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा

नंदुरबार : रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.


ree

गहू, हरभरा व उन्हाळी भुईमूग पिक विमासाठी शेतकऱ्यांना १.५० टक्के प्रमाणे विमा हप्ता भरावा लागणार असून गहूसाठी ५६२.५० प्रती हेक्टर, ज्वारी ३७५ प्रती हेक्टर, हरभरा ५२५ प्रती हेक्टर व उन्हाळी भुईमूग ६०० प्रती हेक्टर असून गहुसाठी व हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर तर उन्हाळी भुईमूगसाठी ३१ मार्च पर्यंत पिकविम्याची रक्कम भरावयाची आहे.


रब्बी हंगामासाठी नैसर्गीक आपत्ती किड आणि रोग, स्थानिक नैसर्गीक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीस संरक्षण तसेच पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनास येणारी घट, जसे नैसर्गीक, आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, भुसखलन, दुष्काळ यांना संरक्षण देय आहे.

तसेच काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचीत पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे.


रब्बी हंगामासाठी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.मंबई या कंपनीची निवड केली असून योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी नैसर्गीक आपत्तीची घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीबाबत विमा कंपनी, संबंधीत बँक, कृषि, महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक १८००१०२४०८८ वर संपर्क साधावा.


 
 
 

Comments


bottom of page