top of page

Video : पीव्ही सिंधूचा हटके डान्स पाहिलात का ?; व्हिडीओ व्हायरल

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला काल (८ नोव्हेंबर) राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पीव्ही सिंधू सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. काल पीव्ही सिंधूची एक इन्स्टाग्राम रील सोशल मीडियावर व्हायरल झाली असून तिच्या या व्हिडीओला ४ लाखांहून अधिक likes मिळाले आहेत.

ree

इंस्टाग्रामवरील या व्हिडीओ क्लिपमध्ये पीव्ही सिंधू पारंपारिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पार्श्वभूमीत ‘सीके द फर्स्ट’ अल्बम चे प्रेमगीत वाजत होते. त्यावर पीव्ही सिंधूने 'लव्ह नवंती' गाण्यावर हटके डान्स केला. इंस्टाग्राम युजर्स तिच्या डान्सचे आणि लूकचे खूप कौतुक करत आहेत. पीव्ही सिंधूचा हा लूक पाहून अनेक यूजर्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.




 
 
 

Comments


bottom of page