top of page

लग्नमंडपातही 'पुष्पा'ची क्रेझ, वधूवराने धरला ‘ओ अंतवा’ गाण्यावर ठेका; Video पाहिलात का?

‘पुष्पा’ या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्सवर मीम्स व्हायरल होत आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच ‘पुष्पा’ चित्रपटातील गाणी आणि संवादावर व्हिडीओ आणि रिल्स तयार करत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वधू आणि वर पुष्पा चित्रपटातील ‘ओ अंतवा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

मराठमोळा लग्नाचा पेहराव असलेल्या वधूने आपल्या डान्स स्टेप्सने सर्वांना नाचण्यास भाग पाडलं. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत वधूवरांसोबत त्यांची मित्रमंडळी आणि नातेवाईक ठेका धरताना दिसत आहेत. शेवटी नवराच नववधूला बसं झालं म्हणत घेऊन जातो.


 
 
 

Comments


bottom of page