top of page

... पुणे महापालिकेच्या उपअभियंत्यास ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर मागील आठवड्यात कारवाई केली. त्या घटनेला आठवडा होत नाही तोच पुणे महापालिकेतील रस्ते विभागाच्या उपअभियंत्यास आज ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुधीर विठ्ठलराव सोनावणे (वय -५१) असे लाच घेणार्‍या उपअभियंत्याचे नाव आहे.

ree

याबाबत अधिक माहिती अशी, पुणे महानगरपालिकेचे रस्ते विभाग वर्ग २ मध्ये सुधीर सोनावणे नेमणुकीस होते. २०१८/१९ यावर्षी एका शाळेचे दुरुस्तीचे काम फिर्यादीने केले होते. मात्र त्याचे बील अद्याप पर्यंत मिळाले नव्हते. सोनवणे यांनी संबंधीत कामाचे बील मंजुर करण्यासाठी आणि दुसऱ्या कामाचे बील काढून देण्याचा मोबदला म्हणून फिर्यादीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांच्यामध्ये झालेल्या तडजोडीनंतर ४० हजार रुपये देण्याचे निश्‍चित झाले होते. दरम्यान, फिर्यादीने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. आज आरोपीला ४० हजार रुपये फिर्यादीकडून घेताना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
 
 

Comments


bottom of page