top of page

अंघोळ करणाऱ्या महिलेचे फोटो काढणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक ; CCTV मुळे प्रकार उघडकीस

पुणे : येथील आयबी गेस्ट हाऊसमध्ये अंघोळ करणाऱ्या महिलेचे बाथरूमच्या खिडकीतून सुरक्षा रक्षकाने फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.२२) घडला आहे. याबाबत सदर महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो सुरक्षारक्षक आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अशोक तुकाराम चव्हाण असे आहे.

ree

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गेस्ट हाऊसमधील बाथरुममध्ये आंघोळ करत असताना आरोपी सुरक्षारक्षक चव्हाण खिडकीबाहेर उभा राहून फोटो आणि व्हिडीओ काढत होता. महिलेला याबाबत शंका आल्याने त्यांनी तात्काळ बाहेर येऊन पाहणी केली.मात्र, त्यांना कोणीही दिसले नाही. या प्रकरणी सदर महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या रुमबाहेरील परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता सुरक्षारक्षक आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने चित्रीकरण केल्याची कबूली दिली. यानूसार सुरक्षारक्षक चव्हाण याला अटक करण्यात आली आहे.




 
 
 

Comments


bottom of page